PAK vs ENG : पाकिस्तानला धडकी..., इंग्लंडची धडाडणारी तोफ संघात परतली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pak vs eng t20 world cup 2022

PAK vs ENG : पाकिस्तानला धडकी..., इंग्लंडची धडाडणारी तोफ संघात परतली?

PAK vs ENG T20 Final Playing-11 : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने तर न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघातील बहुतांश खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. आता अंतिम फेरीत पाकिस्तान आणि इंग्लंड संघ आपल्या विजयी इलेव्हनमध्ये बदल करतात की नाही, याकडे सर्वांच्या नजरा असतील.

हेही वाचा: वय ठरवणार टीम इंडिया मधील एंट्री; पुढील वर्ल्ड कपपूर्वी BCCIचा मोठा प्लॅन ?

इंग्लंड संघाकडून उंपात्य फेरीत सामन्यात अनुभवी फलंदाज डेव्हिड मलान आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांना संधी मिळाली नव्हती. मात्र दोघांची उणीव संघाला भावली नाही. ख्रिस जॉर्डनने भारताविरुद्ध तीन विकेट घेत आपली निवड योग्य ठरवली. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचे महत्त्वाचे बळीही घेतले. मलानच्या जागी खेळणाऱ्या फिल सॉल्टला फलंदाजीची संधी मिळाली नाही. कारण सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनीच संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: Pak vs Eng Final : पावसामुळे अंतिम सामना रद्द ? मेलबर्नमध्ये सलग दोन दिवस पाऊस

मार्क वुड मागील सामन्यात स्नायूंच्या ताणामुळे आणि डेव्हिड मलान मांडीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वुडने यापूर्वी सराव केला आहे, परंतु तो पूर्ण जोमात असल्याचे दिसत नाही. त्याचवेळी मालनच्या मांडीची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. आता कर्णधार जोस बटलर या सामन्यात काही बदल करतो की नाही हे पाहावे लागेल, पण उपांत्य फेरीत खेळणाऱ्या खेळाडूंसोबत इंग्लंडचा संघ जाईल, असे मानले जात आहे.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.