Asia Cup : अंतिम सामन्यात भारतीयांना पोलिसांकडून धक्काबुक्की; नाकारला प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup

Asia Cup : अंतिम सामन्यात भारतीयांना पोलिसांकडून धक्काबुक्की; नाकारला प्रवेश

Asia Cup 2022 : आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. तरीही टीम इंडियाच्या अनेक चाहते सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. भारत आर्मी या प्रसिद्ध फॅन क्लबच्या सदस्याने दावा केला आहे की, त्याला आणि इतर दोन चाहत्यांना भारतीय जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करून दिला नाही. भारत आर्मीने ट्विटरवर लिहिले की, भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करू शकत नाही. हे अत्यंत धक्कादायक वागणूक आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: VIDEO : पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापला; भारतीय पत्रकाराशी केले भांडण

भारत आर्मी ने पुढे लिहिले की, आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषद आम्ही तुम्हाला चौकशीची विनंती करत आहे. कारण अनेक चाहते आशिया कप पाहण्यासाठी भारतातून प्रवास करूण येतात. त्यांना स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी सांगितले की ते स्टेडियममध्ये जाऊ शकत नाहीत! हे अत्यंत धक्कादायक वर्तन आहे.

हेही वाचा: SL vs PAK : लंका जिंकली कशी; भारताने 'या' सिंहांकडून काय शिकावे?

आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले. लंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आला. खराब सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेने नंतर दमदार कमागिरी करत सामन्यावर नियंत्रण ठेवले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. तर अष्टपैलू वानिंदू हसरंगाने फलंदाजीत आक्रमक 36 धावा तर गोलंदाजीत मौल्यवान रिझवानसह 27 धावात 3 विकेट घेतल्या.

Web Title: Pak Vs Sl Indian Fans Did Not Get Entry Asia Cup Final Police For Pushing Video Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..