live मॅचमध्ये पाकिस्ताच्या शादाब खानचा 'जबरा फॅन' थेट मैदानात

हे पाहून पाकिस्तानचा उपकर्णधार शादाबने रागावण्याऐवजी त्याला मिठी मारली.
fan runs salute pakistani star shadab khan
fan runs salute pakistani star shadab khan

Pak Vs Wi Odi: पाकिस्तानने आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय झाला. सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 120 धावांनी पराभव केला. या विजयासह बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना याच मैदानावर 12 जून रोजी होणार आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक प्रेक्षक थेट मैदानात आला. त्याचा आवडता क्रिकेटर शादाब खानला सलाम करू लागला. हे पाहून पाकिस्तानचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शादाबने रागावण्याऐवजी त्याला मिठी मारली. (fan runs salute pakistani star shadab khan)

fan runs salute pakistani star shadab khan
आंतरराज्य ॲथलेटिक्स : संजीवनी जाधवला सुवर्ण, रौप्यही महाराष्ट्राच्या प्राजक्ताला

पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना सामन्याच्या 39व्या षटकात ही घटना घडली. आपल्या आवडत्या खेळाडूला मिठी मारल्यानंतर हा फॅन्स खूप आनंदी झाला होता. आनंदाने उड्या मारत तो मैदानाबाहेर गेला. वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने हे संपूर्ण चित्र प्रेक्षणीय असल्याचे म्हटले आहे. एक चाहता मैदानावर असा धावत येतो हे स्वतःच एक छान चित्र होते. अशा परिस्थितीत शादाबने त्याच्यावर रागावण्याऐवजी त्याला मिठी मारली आणि परत पाठवले.

fan runs salute pakistani star shadab khan
आंतरराज्य ॲथलेटिक्स : संजीवनी जाधवला सुवर्ण, रौप्यही महाराष्ट्राच्या प्राजक्ताला

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकात आठ गडी बाद 275 धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 77 आणि इमाम-उल-हकने 72 धावा केल्या. बाबर आणि इमाम या दोघांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सहाव्यांदा 50+ धावा केल्या आहे. 276 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 32.2 षटकांत केवळ 155 धावा करता आल्या. शामराह ब्रुक्सने 42 आणि काइल मेयर्सने 33 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने चार आणि मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन खेळाडूंना बाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com