पाकिस्तानने लंकेला घरी बोलावलं आणि कसला संघ जाहीर केलाय बघा

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार मिस्बा उल हक काम बघेल. 

इस्लामाबाद : अखेर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला जाण्यास तयार झाला. त्यामुळे पाकिस्तान अनेक वर्षांनी घरच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेईल. पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार मिस्बा उल हक काम बघेल. 

कसोटीत वीरुसारखं चमकण्यासाठी गावसकरांचा रोहितला मोठा सल्ला

या संघात महंमद नवाज पुनरागमन करत आहे. त्याने गेल्या आठवड्याच खैबर पख्तुनवाविरुद्ध झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक केले. त्यामुळेच त्याच्यासाठी पाकिस्तानच्या संघाचे दराजे पुन्हा उघडले. आशिया कप 2018 नंतर त्याला चांगली कामगिरी करता आली नाही आणि म्हणूनच त्याने संघातील स्थान गमावले. मात्र, आता त्याचे पुनरागमन झाले आहे. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या आणखी एक खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. इफ्तिकार अहमद असे त्याचे नाव आहे. तसेच अबीद अली, महंमद रिझवान आणि उस्मान शिनवारी यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. 

आता मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही; क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय

मात्र, या संघात विश्वकरंडक गाजविणारे शाहिन आफ्रिदी आणि हसन अली यांना स्थान मिळालेले नाही. दोघेही तंदुरुस्त नसल्याने त्यांना संघातून वगळले आहे. 

पाकिस्तानचा संघ : सर्फराज अहमद, बाबर आझम, अबीद अली, असिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, महंमद हसनैन, इफ्तिकार अहमद, इमाद वसिम, इमामा उल हक, महंमद आमिर, महंमद नवाझ, महंमद रिझवान, शादाब खान, उस्मान शिनवारी, वहाब रियाझ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Announce 16-Member ODI Squad To Face Sri Lanka