Asia Cup 2022 : आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! पहिला सामना भारताशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan announce squads for asia cup 2022

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! पहिला सामना भारताशी

Pakistan Announce Squads for Asia Cup 2022 : यूएई येथे होणाऱ्या आगामी टी-20 आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने संघाची घोषणा केला आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना रविवारी 28 ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध होणार आहे. बाबर आझमकडे संघाचं नेतृत्व तर शादाब खानकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीसीबीने आशिया चषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान युएईमध्ये आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.

भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. तर ब गटात यजमान श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. सर्व सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील. या स्पर्धेतील 10 सामने दुबईने तर तीन सामन्यांचे यजमानपद शारजाहने घेतले आहे.

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ - बाबार आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार),असिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तीखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम जेएनआर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शहनवाज दहानी आणि इस्मान कदीर