Virat Kohli: वाढदिवस विराट कोहलीचा पण चर्चा पाकिस्तानी गोलंदाजाच्या ट्विटची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli: वाढदिवस विराट कोहलीचा पण चर्चा पाकिस्तानी गोलंदाजाच्या ट्विटची

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा आज 34 वा वाढदिवस. विराट कोहलीचा वाढदिवस कालपासून सोशल मीडियावर साजरा केला जात आहे. अनेक दिग्गजांनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीच्या चाहत्यांनी विराट कोहलीली ट्विटवर टॅग करीत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच ट्विटरवर पाकिस्तान गोलंदाजाने विराटला दिलेल्या शुभेच्छाची चर्चा आता सुरू झाली आहे.

शहनवाज दहानी हा पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने ट्विट करत म्हंटलं आहे की, मी शनिवारपर्यंत वाट नाही पाहू शकत. तसेच विराट कोहली सोबत ट्विटरवर एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्य“विराट कोहलीने क्रिकेटला चांगले दिवस आणलेत, अशा व्यक्तीला शुभेच्छा द्यायला मी शनिवारची वाट पाहणार नाही. तुझा दिवस आनंदात जावो, जगाचं असाचं मनोरंजन करत रहा ” अशा हटके शुभेच्छा दिल्याने शहनवाज दहानीची चर्चा सोशल मीडियावर अधिक रंगली आहे.

हेही वाचा: Happy Birthday Virat Kohli : सचिन तेंडुलकरचे हे 4 मोठे विक्रम 'किंग कोहली'ने मोडले

आशिया चषकापासून कोहलीचा परफॉर्म चांगला आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये कोहलीने चांगली कामगिरी केली होती. तसेच सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत विराटने चांगली खेळी केली . त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने 220 धावा काढल्यात.

हेही वाचा: Virat Kohli Birthday : किंग कोहलीच्या वाढदिवसाआधीच हा काय ट्रेंड सुरू झालाय?