Pakistan vs South Africa ICC Cricket World Cup 2023
Pakistan vs South Africa ICC Cricket World Cup 2023

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान अजूनही जाऊ शकतो वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत, समजून घ्या टॉप-4 चे गणित

Pakistan vs South Africa ICC Cricket World Cup 2023

Pakistan Semi Final Scenario In World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फ्लॉप शो सुरूच आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. यासोबतच त्यांनी पराभवाचा चौकार मारला.

आता अशा लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकेल का? जर ते शक्य असेल तर त्याचे समीकरण काय असेल?

Pakistan vs South Africa ICC Cricket World Cup 2023
Pak vs Sa World Cup : 'खराब अंपायरमुळे पाकिस्तान हरला...' भारतीय दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने पहिले 2 सामने जिंकले, त्यानंतर सलग 4 सामने गमावले. अशाप्रकारे पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानची स्थिती वाईट आहे. 4 गुण आणि नेट रन रेट -0.387. हा संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चाहत्यांना अपेक्षा होती की पाकिस्तान विजयासह पुनरागमन करेल, परंतु तसे झाले नाही आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

Pakistan vs South Africa ICC Cricket World Cup 2023
Pak vs Sa World Cup : 'खराब अंपायरमुळे पाकिस्तान हरला...' भारतीय दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

'या' समीकरणाने पाकिस्तान अजूनही गाठू शकतो उपांत्य फेरी

दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानला पुनरागमन करणे जवळपास अशक्य झाले आहे. आतापर्यंत संघाला उर्वरित 4 सामने जिंकून 12 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी होती, परंतु आता संघाकडे केवळ 3 सामने राहिले आहेत.

आता जर तुम्ही असा विचार करत असाल की पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहे, तर हे १००% खरे नाही. परंतु या संघाला उपांत्य फेरी गाठण्याची अजूनही संधी आहे.

मात्र, यासाठी बाबर अँड कंपनीला उर्वरित 3 सामने कोणत्याही किंमतीत मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. तरी पण अशा परिस्थितीत या संघाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी आहे. पाकिस्तानला त्यांचे पुढील 3 सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबत खेळायचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com