आफ्रिदी फिव्हर! PCB ने वयाच्या घोटाळ्यावरुन स्पर्धा केल्या स्थगित

Pakistan Cricket Board Over Aged Player
Pakistan Cricket Board Over Aged Playeresakal

कराची : पाकिस्तानचा स्टार माजी खेळाडू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) तो खेळत असताना याच्या दोन गोष्टी फार प्रसिद्ध होत्या. एक त्याचे षटकार आणि दुसरे म्हणजे त्याचे न वाढणारे वय. शाहीद आफ्रिदीचे वय (Shahid Afridi Age) किती हा एक संशोधनाचा विषय होता. आफ्रिदीच्या वयाबाबत हास्य विनोदाने बोलले जायचे मात्र आता हाच आफ्रिदी फिव्हर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pakistan Cricket Board) डोकेदुखी ठरला आहे. पीसीबीने राष्ट्रीय स्तरावरील 13 वर्षाखालील आणि 16 वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धा वयाच्या घोटाळ्यामुळे (Over Aged Player) स्थगित केल्या. कराची आणि मुल्तान मधील सामन्यात काही जास्त वयाचे खेळाडू सहभागी झाले होते. याची माहिती पीसीबीला मिळताच त्यांनी स्पर्धा स्थगित केली. (Pakistan Cricket Board Over Aged Player)

Pakistan Cricket Board Over Aged Player
FIFA 2021 : मेस्सीला मागे टाकत लेवांडोवस्की ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) म्हणण्यानुसार मुल्तानमध्ये प्रत्येक क्रिकेट असोसिएशनचे दोन संघ सहभागी झाले आहेत. त्यांची सर्वांची बोन एज टेस्ट मंगळवारी आणि बुधवारी होईल. यामध्ये 150 खेळाडूंचा समावेश आहे. याबाबत पीसीबीचे उच्च कामगिरी संचालक नदीम खान यांनी 'आम्ही काही फुटेज पाहिले त्यात काही ओव्हर एज खेळाडू 13 वर्षाखालील आणि 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत खेळल्याचे आढळून आले. त्यामुळे आम्ही स्पर्धा स्थगित केली आणि नव्याने बोन एज टेस्ट करणार आहोत.'

Pakistan Cricket Board Over Aged Player
तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग?

ते पुढे म्हणाले की, 'पीसीबी (PCB) ही पाकिस्तानातील सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था ओव्हर एज खेळाडूंना व्यवस्थेतील त्रुटींचा कोणताही गौरफायदा घेऊ देणार नाही. यामुळे जे वयात बसणारे खेळाडू आहे त्यांच्यावर मानसिक दबाव वाढतो आणि त्यांचे खच्चीकरण होते. ओव्हर एज खेळाडूंचे खेळणे हा गुन्हाच नाही तर आपल्या व्यवस्थेतील कमतरता देखील दर्शवते. आता ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com