देशाला विकणारा 'फिक्सर' भाषण देत असेल तर... पाक क्रिकेटरमध्ये जुंपली!

Salman Butt And Sarfaraz Ahmed
Salman Butt And Sarfaraz Ahmed Sakal

PSL 2022, Sarfaraz Ahmed Vs Salman Butt: पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) स्पर्धा सुरु आहे. एका बाजूला या स्पर्धेत जगभरातील अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडूंमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (pakistan cricketer sarfaraz ahmed fight salman butt match fixing)

पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदच्या (Sarfaraz Ahmed) PSL मधील कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याशिवाय तो मैदानातील गैरवर्तनामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट्टनं (Salman Butt )आपल्या युट्यूब चॅनेलवरुन त्याच्यावर निशाणा साधला आहे.

Salman Butt And Sarfaraz Ahmed
IPL 2022 Mega Auction : RCB या खेळाडूवर लावेल 'विराट' बोली!

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत सरफराज अहमद क्वेटा ग्लेडियेटर्सचा कर्णधार आहे. मागील काही सामन्यात भान विसरुन तो मैदानात वावरताना दिसले. एवढेच नाही तर त्याच्या कामगिरीसह संघाची कामगिरीही खराब राहिली आहे. यासंदर्भात सलमान बट्टनं प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सलमान बट्ट ...?

सरफराज अहमद जे काही करतोय ती चांगली गोष्ट नाही. तो चर्चा करत नाही तर नुसता ओरडतो. तो स्वत:ला दुसऱ्यावर लादण्याचे काम करताना दिसते. नसीम शाहने हात जोडून फिल्डर मागितला पण त्याने त्याला नकार दिला. पाकिस्तान सुपर लीगच्या सुरुवातीपासून तो एका संघाकडून खेळतोय. त्याला स्वत:च्या स्वभावात बदल करून आपल्या कामगिरीवर लक्ष देण्याची गरज आहे, अशा आशयाचे वक्तव्य करत सलमान बट्टनं सरफराजवर टीका केली आहे.

Salman Butt And Sarfaraz Ahmed
गोल्डन बॉय नीरज चोप्राची 2022 Laureus Award साठी निवड

सरफराज अहमदने डिलीट केल ट्विट

त्यानंतर सरफराजने पलटवार करत सलमान बट्टवर निशाणा साधला. पाकिस्तानला ऑन ड्यूटी विकणारा फिक्सर जर नैतिकतेच भाषण देत असेल तर..अल्लाह हाफीज असे ट्विट सरफराजनं केले होते. काही काळानंतर सरफराज अहमदनं हे ट्विट डिलिट केले. सलमान बट्ट 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग आढळला होता. हा संदर्भासह सरफराजनं ट्विटमधून नाव न घेता सलमान बट्टवर निशाणा साधलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com