इंग्लंडने पाकला घरच्या मैदानात चारली पराभवाची धूळ! दुसरी कसोटी जिंकत रचला इतिहास | England Defeat Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England Defeat Pakistan 2nd Test

PAK vs ENG : इंग्लंडने पाकला घरच्या मैदानात चारली पराभवाची धूळ! दुसरी कसोटी जिंकत रचला इतिहास

England Defeat Pakistan 2nd Test : इंग्लंडने पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटी देखील 27 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर दुसऱ्या डावात विजयासाठी 355 धावांचे आव्हाव ठेवले होते. मात्र चौथ्याच दिवशी पाकिस्तानचा संपूर्ण संघ 328 धावात माघारी परतला. पाकिस्तानकडून सौऊद शकीलने 94 धावा करत झुंज दिली. मात्र मार्क वूडने पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडेच मोडले. त्याने दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या. इंग्लंडने तब्बल 22 वर्षानंतर पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये पराभव केला.

हेही वाचा: IND vs BAN : पंतऐवजी पुजारा का झाला उपकर्णधार! केएल राहुलने सांगितले मोठे कारण

दुसऱ्या कसोटी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 281 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा पदार्पण करणाऱ्या अब्रार अहमदने 7 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून डकेट (63) आणि ऑली पोप (60) यांनी चांगले योगदाकन दिले.पाकिस्तानला मात्र मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 75 तर सौऊद शकीलने 63 धावांचे योगदान दिले. तर इंग्लंडकडून जॅक लिचने 4 विकेट घेत चांगला मारा केला.

हेही वाचा: Team India: बदल तर होणारच! BCCIने रोहित अन् विराटचे केलं 'पॅकअप'?

दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडने दमदार फलंदाजी करत 275 धावा उभारल्या. पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या हॅरी ब्रुकने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात देखील 108 धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडचा सलामीवीर डकेटने 98 चेंडूत आक्रमक 79 धावा करून चांगली सुरूवात करून दिली होती. त्याने पहिल्या डावात देखील 63 धावा केल्या होत्या. यानंतर स्टोक्सनेही 41 धावांचे योगदान देत पाकिस्तानसमोर दुसऱ्या डावात विजयासाठी 355 धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या अब्रारने 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांनी झुंजारपणा दाखवला. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या सौऊद शकीलने दुसऱ्या डावातही 94 धावांची खेळी केली.

हेही वाचा: Sania Mirza Divorce: 'सानियासोबत आता...' शोएब मलिकनं दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

इमाम उल हकने 60 मोहम्मद नवाझने 45 तर अब्दुल्ला शफिकने देखील 45 धावांचे योगदान दिले. मोहम्मद नवाझ आणि शकील खेळत असताना पाकिस्तानने 6 बाद 290 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र मोक्याच्या क्षणी मार्क वूडने या दोघांनीही बाद करत सामना इंग्लंडच्या बाजूने झुकवला. या पडझडीनंतर पाकिस्तानची अवस्था 9 बाद 319 अशी झाली होती. दरम्यान, आगा सलमानने 20 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र रॉबिन्सनने शेवटचा फलंदाज मोहम्मद अलीला बाद करत पाकिस्तानची अखेरची फडफड संपवली.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?