
World Cup 2023 India Vs Pakistan : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रत बीसीसीआयने गेल्या महिन्यातच प्रसिद्ध केलं होते. मात्र तरी देखील पाकिस्तानचा संघ भारतात येणार का नाही हे अजूनही गुलदस्त्यात होतं. कारण पीसीबीला पाकिस्तान सरकारने भारतात आपला संघ पाठवण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती.
वर्ल्डकप काही महिन्यावर आला असताना पाकिस्तान सरकारनं भारतातील वर्ल्डकप खेळण्यासाठी संघ पाठवण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी मोठी समिती नेमली होती. पाकिस्तान सरकारने भारतातील संघाच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली होती. (Pakistan Cricket Team)
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अखेर पाकिस्तान सरकारने पीसीबीला त्यांचा पुरूष क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात भारतात होणारा वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.
भारतात ऑक्टोबर महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्डकप आयोजित केला जाणार आहे. यापूर्वी पाकिस्तानमध्ये आशिया कपचं आयोजन होणार आहे. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची भाषा केली होती.
मात्र ही धमकी पोकळ होती हे पाकिस्तान सरकारनं त्यांच्या संघाला भारतात पाठवण्याच्या निर्णय घेतल्यानंतर सिद्ध झालं. भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर आशिया कपच्या आयोजनाचे हायब्रीड मॉडले समोर ठेवण्यात आले.
यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन ठिकाणी आशिया कप होणार आहे. यंदा वनडे फॉरमॅमटमध्ये होणाऱ्या या आशिया कपमधील भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानला आशिया कपचे यजमानपद विभागून घ्यावे लागल्यामुळे त्यांनी भारतातील वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याबाबत नाटक सुरू केलं होतं.
मात्र आयसीसीने आधीच पाकिस्तानकडून भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये सहभाही होण्याबाबत लिखीत आश्वासन घेतले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पाकिस्तान बहिष्काराच्या ज्या धमक्या देत होता ते पेल्यातलं वादळ होतं.
(Sports Latest News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.