World Cup India Vs Pakistan : काय खरं नाही! ते पत्र पाठवून पीसीबीनं माती खाल्ली; पाक सरकार जाम भडकलं

PCB Update : पीसीबीने गेल्या महिन्यात पंतप्रधानांना भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याबाबतची परवानगी मागणारे पत्र लिहिले होते. मात्र या पत्राच्या स्वरूपावरून इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
World Cup 2023 India Vs Pakistan
World Cup 2023 India Vs Pakistanesakal

World Cup 2023 Update : पाकिस्तान भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. पाकिस्तान सरकारने अजून पीसीबीला त्यांचा संघ भारतात पाठवण्याबाबत परवानगी दिलेली नाही. त्यातच पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पाठवलेल्या पत्रामुळे वाद निर्माण झाला आहे.

पीसीबीने गेल्या महिन्यात पंतप्रधानांना भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याबाबतची परवानगी मागणारे पत्र लिहिले होते. मात्र या पत्राच्या स्वरूपावरून इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की याबाबत पीसीबीच्या अधिकाऱ्यांना आमची नाराजी कळवली आहे. (Pakistan Cricket Board)

World Cup 2023 India Vs Pakistan
Ben Stokes MS Dhoni : सीएसकेच्या 'भावी' कर्णधाराचा धोनीलाच धोबीपछाड; तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत असं काय घडलं?

द न्यूजला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीसीबीच्या चिफ ऑपरेटिंग ऑफिसर सलमान नासीर यांनी पंतप्रधान शाहबाज यांना पत्र पाठवले होते. ते पत्र प्रोटोकॉल तोडणारे होते. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधायला हवा होता. (ICC ODI World Cup 2023)

याबाबत उच्च अधिकाऱ्यांना कळवणे गरजेचे होते. अशी नाराजी उच्च अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पीसीबीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले ही पद्धत चुकीची असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

World Cup 2023 India Vs Pakistan
Sunil Gavaskar: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...', रोहित-द्रविडच्या कामगिरीवर गावसकरांनी खरडपट्टी काढत घेतली शाळा

द न्यूजच्या सूत्रांनी दावा केला आहे की, 'हा विषय थेट पंतप्रधानांकडे घेऊन जाणे हा सरकारचे नियम तोडणारे आहे. आम्ही पीसीबीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यांच्याकडे हाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सरकारची एक ठरलेली पद्धत आहे. मात्र ही पद्धत यावेळी वापरण्यात आली नाही. आम्ही आमची नाराजी व्यक तेली आहे. याबाबत अजून काही करता येईल का हे पाहण्यात येत आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com