Hasan Ali | PAK vs BAN 1st T20 ODI: वर्ल्ड कपचा 'व्हिलन' हसन ठरला सामनावीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pak-vs-Ban

बांगलादेशवर विजय मिळवत पाकिस्तानची मालिकेत आघाडी

PAK vs BAN 1st ODI: वर्ल्ड कपचा 'व्हिलन' हसन ठरला सामनावीर

PAK vs BAN, 1st T20 : टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या पाकिस्तानी संघाने बांगलादेश विरूद्ध आज विजय मिळवला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली आहे. त्यातील पहिल्या सामन्यात हसन अलीने ४ गडी आणि ४ चेंडू राखून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. वर्ल्ड कपच्या सामन्यात कॅच सोडल्याने हसन अलीला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आज या दमदार कामगिरीमुळे हसन अलीने सुटकेचा निश्वास टाकला.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने २० षटकात ७ बाद १२७ धावांपर्यंत मजल मारली. अफीफ होसेनच्या ३६, मेहदी हसनच्या नाबाद ३० आणि नुरूल हसनच्या २८ धावांच्या खेळीमुळे बांगलादेशच्या संघाला कसाबसा १२० धावांचा टप्पा ओलांडता आला. पाकच्या गोलंदाजी भेदक मारा करत फलंदाजांना फारसं डोकं वर काढू दिलं नाही. हसन अलीने २२ धावांत ३, मोहम्मद वासिमने २४ धावांत २ तर शादाब खानने २० धावांत १ बळी टिपत बांगलादेशला १२७ धावांवर रोखलं.

हेही वाचा: Video: भरमैदानात 'टीम इंडिया'च्या खेळाडूला आली हाक अन्...

१२८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरूवात थोडीशी खराबच झाली. मोहम्मद रिझवान (११), बाबर आझम (७), हैदर अली (०), शोएब मलिक (०) चौघे स्वस्तात बाद झाल्याने पाकची अवस्था २४ धावांत ४ बळी अशी झाली होती. पण फखर झमानच्या ३४ धावा, खुशदील शाहच्या ३४ धावा आणि शादाब खानची १० चेंडू २१ धावांची तडाखेबाज खेळी याच्यावर जोरावर पाकिस्तानने ४ चेंडू राखून सामना जिंकला.

loading image
go to top