IND vs NZ | Video: भरमैदानात 'टीम इंडिया'च्या खेळाडूला तरूणीकडून आली एक हाक अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak-Chahar-Malti-Sister

हाक येताच त्याने मागे पाहिलं आणि पुढे जे घडलं ते...

Video: भरमैदानात 'टीम इंडिया'च्या खेळाडूला आली हाक अन्...

IND vs NZ 1st T20 : भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते न्यूझीलंडला पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. गप्टीलच्या ७० आणि चॅपमनच्या ६३ धावांच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यास प्रत्युत्तर देताना सूर्यकुमार यादवच्या ६२ आणि रोहितच्या ४८ धावांच्या खेळीमुळे भारताना सामना जिंकला. या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा: IND vs NZ: T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना भारताचा दीपक चहर सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. फिल्डिंग करताना त्याला प्रेक्षकांमधून एक हाक आली. एका तरूणीची ती हाक होती. त्या तरूणीने त्याच्याशी बाहेरूनच संवाद साधला आणि त्याच्याशी गप्पा मारल्या. दीपकनेही तिला प्रश्न विचारला. बाकीचे लोक कुठे बसले आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला, त्यावर त्या तरूणीने उत्तरही दिले.

हेही वाचा: IND vs NZ: राहुलने एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम

ती तरूणी म्हणजे दीपक चहरची बहिण मालती. दीपक चहर जेव्हा IPL खेळत होता, त्यावेळी मालतीचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला मिस्ट्री गर्ल म्हणून संबोधलं जायचं. पण नंतर चाहत्यांना तिची ओळख समजली आणि सध्या तिच्या वैयक्तिक चाहत्यावर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

loading image
go to top