esakal | T20 WC टीम सिलेक्शननंतर तासाभरात कोचचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Cricket Team

T20 WC टीम सिलेक्शननंतर तासाभरात कोचचा राजीनामा

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीमची घोषणा केल्यानंतर तासाभरातच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनिस यांनी संघ निवडीनंतर दोन तासातच राजीनामा दिला आहे. मिस्बाह आणि वकार यूनिस यांनी सप्टेंबर 2019 पासून पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी देण्यात आली होती. करारानुसार 1 वर्षांचा कालावधी बाकी असताना त्यांनी संघाला मोठा धक्का दिला आहे.

या दोन दिग्गजांनी तडकाफडकी घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रझाक या दोघांना तात्पुरत्या स्वरुपात मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानात 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांच्या मालिका खेळणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup: 'टीम इंडिया'ची घोषणा कधी? आली महत्त्वाची अपडेट

या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तान रवाना होईल. यजमान पाकिस्तानी संघ या मालिकेसाठी 8 सप्टेंबर रोजी इस्लामाबादला एकत्रित येईल. सध्याच्या घडीला कोचिंग स्टाफ हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून टी-20 वर्ल्डसाठी लवकरच पाकिस्तान संघाला नवा प्रशिक्षक निवडला जाणार आहे.

loading image
go to top