esakal | T20 World Cup: 'टीम इंडिया'ची घोषणा कधी? आली महत्त्वाची अपडेट
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India-T20

T20 World Cup: 'टीम इंडिया'ची घोषणा कधी? आली महत्त्वाची अपडेट

sakal_logo
By
विराज भागवत

IPL स्पर्धेनंतर रंगणार टी२० विश्वचषकाचा थरार

T20 World Cup 2021: भारतीय संघ (Team India) सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडू IPL साठी युएईमध्ये (IPL 2021 in UAE) दाखल होणार आहेत. तेथेच IPL स्पर्धेनंतर विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2021) रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढल्या २४ ते ४८ तासांत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. BCCIच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. भारतीय संघासाठी १५ खेळाडूंचा चमू (Squad) आधी निवडण्यात आला आहे, फक्त चमूची घोषणा करणे बाकी आहे, अशी महत्त्वाची अपडेट (Updates) BCCIच्या सूत्रांकडून मिळाली.

हेही वाचा: भारताचं टेन्शन वाढलं; दोन स्टार खेळाडू फिल्डिंगला गैरहजर

"भारतीय संघ कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. संघाची घोषणा होणं हे चौथ्या कसोटीवर अवलंबून आहे. जर चौथा सामना लवकर संपला तर १५ खेळाडूंच्या चमूची घोषणा आजच (सोमवारी) केली जाईल. पण जर सामना वेळेवर संपला नाही, तर मात्र भारतीय चमूची घोषणा मंगळवारी होईल", अशी माहिती BCCIच्या सूत्रांकडून देण्यात आली.

हेही वाचा: शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! दुहेरी अर्धशतक ठोकत केला पराक्रम

भारताच्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची निवड जवळपास निश्चित आहे. पर्याय म्हणून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची नावे चर्चेत आहेत. मधल्या फळीत विराट कोहलीचे नाव निश्चित आहे. त्यासोबत सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांची नावे शर्यतीत आहेत. वेगवान गोलंदाजीची आघाडी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांच्यावर असेल अशा चर्चा आहे. तर, युझवेंद्र चहल फिरकीपटू म्हणून संघात असेल. अष्टपैलू खेळाडूंच्या जागेसाठी हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजा या तिघांची चर्चा असेल.

loading image
go to top