Asian Hockey Champions Trophy 2026 latest update
esakal
Asian Hockey Champions Trophy 2026 latest update: भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधाचे पडसाद खेळाच्या मैदानावरही उमटलेले अनेकदा पाहायला मिळाले आहेत. India vs Pakistan यांच्यातील द्विदेशीय क्रिकेट मालिका केव्हाच बंद झालीय, पण आयसीसीच्या व आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. पण, संबंध कितीही बिघडलेले असले तरी अन्य खेळांमध्ये वाद फार दिसलेला नाही. पण, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB ) नखऱ्यानंतर पाकिस्तान हॉकी संघालाही खुमखूमी आली आहे.