पाकिस्तानचा Most Valuable Cricketer अन् ती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Rizwan

पाकिस्तानचा Most Valuable Cricketer अन् ती!

पाकिस्तानचा स्टार विकेट किपर बॅट्समन मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) मोस्ट वॅल्युएबल क्रिकेटर (Most Valuable Cricketer) पुरस्काराने सन्मानित केले आहे. 2021 या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच बक्षीस त्याला या पुरस्काराच्या स्वरुपात मिळाले. बाबर आझम (Babar Azam) , हसन अली (Hasan Ali) आणि शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) हे तगडे खेळाडूही त्याच्यासोबत या पुरस्काराच्या शर्यतीत होते. पण अखेर रिझवानने बाजी मारलीये.

मोहम्मद रिझवानने 2021 मध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कसोटीत 455, वनडेत 134 आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 1326 धावा कुटल्या आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात त्याने विकेटमागे 56 जणांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर सातत्याने दमदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा: नशीबवान स्टोक्स! बॉल स्टम्पला लागूनही नाबाद; सचिन म्हणाला....

मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळीच्या जोरावरच पाकिस्तानने इतिहासात पहिल्यांदा भारतीय संघाला पराभूत करुन दाखवले होते. रिझवानच्या बहरदार खेळीमुळे त्याचा फॅन फॉलोवर्स चांगलाच वाढलाय. कराचीमधील एका सामन्यात रिझवानसाठी फलकबाजी करत एका तरुणींने त्याला साद घातली होती. ‘रिजवान प्लीज एडॉप्ट मी’ अस बॅनर घेऊन रिझवानची चाहतीनं स्टेडियमवरील सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होते.

हेही वाचा: त्याला कैद्यासारख ठेवलंय; जोकोविच्या आईचा अधिकाऱ्यांवर आरोप

नेटकऱ्यांनी ही तरुणी कोण होती हे देखील शोधून काढले होते. 14 डिसेंबर रोजी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना रंगला होता. यावेळी स्टेडियममध्ये हिरव्या रंगाच्या पाकिस्तानी जर्सीमध्ये तरुणी मोहम्मद रिझवानला चीयर करताना दिसली होती. तिच नाव इमान असल्याची चर्चाही रंगली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top