त्याला कैद्यासारख ठेवलंय; जोकोविच्या आईचा अधिकाऱ्यांवर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dijana Djokovic And Novak Djokovic

व्हिसा प्रकरणात नोवाक जोकोविचच्या आईची प्रतिक्रिया; ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

त्याला कैद्यासारख ठेवलंय; जोकोविच्या आईचा अधिकाऱ्यांवर आरोप

AUS Open 2022: टेनिस जगतातील अव्वल खेळाडू नोवाक जोकोविच सध्या कोर्टवरील काममगिरीपेक्षा वेगळ्याच मुद्यावरुन चर्चेत आहे. 20 वेळा ग्रँडस्लॅम जिंकलेल्या जोकोविचला (Novak Djokovic) कोरोना प्रतिबंधित लस घेतली नसताना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत (AUS Open 2022) सहभागी होण्याची सूट दिली होती. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी तो ऑस्ट्रेलियात पोहचला. पण व्हिसामधील अडचणीमुळे गुरुवारी तो अडचणी सापडला. ऑस्ट्रेलियाने त्याला प्रवेश नाकारला. विमानतळावर त्याला जवळपास 8 तास ताठकळत बसावे लागले. यावरुन आता जोकोविचच्या आईनं प्रतिक्रिया दिली आहे.

सर्बियन टेनिस स्टार जोकोविचची आई Dijana Djokovic यांनी ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी नोवाक जोकोविचला एखाद्या कैद्यासारखी वागणूक दिली. त्याच्या राहण्याची व्यवस्थाही योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: VIDEO : नंबर वन बॉलरला मार्क वूडचा कडक सिक्सर, गिलस्पीही फिदा

जोकोविचची आई म्हणाली की, सध्या मी घाबरलेली आहे. मागील 24 तासांपासून त्यांनी नोवाकला कैद्यासारखं ठेवलंय. हे अशोभनिय असून ही घटना त्याचे इरादे आणखी मजबूत करतील. तो स्पर्धा जिंकून दाखवेल, असा विश्वासही नोवाक जोकोविचच्या आईने व्यक्त केलाय. जोकोविचला ज्या ठिकाणी ठेवले आहे ते ठिकाण दुर्गंधीयुक्त आहे. त्याच्यासाठी एखाद्या चांगल्या हॉटेलची व्यवस्था केलेली नाही. आमच्या भाड्याच्या घरातही त्याला जाऊ दिले जात नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: कॅप्टन वेळचं भान विसरला तर गोलंदाजाला फटके, ICC चा नवा नियम

जोकोविचसोबत बोलणं झालं. तो ठिक आहे पण त्याला झोपही येत नाही. तो ज्या अवस्थेत आहे ती कल्पना करुन काळीज तुटतं आहे, अशी भावनाही नोवाक जोकोविचच्या आईने व्यक्त केल्या आहेत. व्हिसा रद्द करण्यात आल्यानंतर जोकोविचला Immigration विभागाच्या हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे. त्याला पुन्हा मायदेशी पाठवण्यात येऊ शकते. दुसरीकडे व्हिसा रद्द केल्याप्रकरणी त्याच्या वकिलांनी आवाहन दिले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 17 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत तो खेळणार की नाही हे आताच सांगणे मुश्किल आहे. 34 वर्षीय जोकोविचने विक्रमी 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. सध्याच्या घडीला रॉजर फेडरर आणि राफेल नदालसह तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत त्याला या दोघांना मागे टाकून अव्वल होण्याची संधी होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top