व्हॉलीबॉलमध्ये पाकला नमवले

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

भारताने 23 वर्षांखालील गटाच्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत पाकिस्तानला हरविले.

नवी दिल्ली -  भारताने 23 वर्षांखालील गटाच्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत पाकिस्तानला हरविले. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
भारताने 21-15, 25-16, 25-22, 25-18 असे हरविले.

भारताने या स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. याबरोबरच भारताने जागतिक स्पर्धेची पात्रता सुद्धा संपादन केली. अमित गुलीया भारताचा कर्णधार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Out of Asian U-23 Volleyball Championship