PAKvsSL : पाकिस्तानच्या अख्ख्या टीमचे मायदेशात पदार्पण

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

- कर्णधार म्हणून सर्फराजचा घरच्या मैदानावर पहिलाच सामना
- संघातील तब्बल 10 खेळाडूंचा घरच्या मैदानावर पहिलाच एकदिवसीय सामना
- पहिला सामना पावसामुळे रद्द

कराची : पाकिस्तानच्या संघाला अखेर तब्बल 10 वर्षांनी घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज सुरवात झाली. कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये या सामन्याला सुरवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पावसामुळे या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नव्हती. 

धोनीच्या क्रिकेट संन्यासावर गंभीर म्हणतो, मला नाही वाटतं...

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याचा मायदेशात कर्णधार म्हणून पहिला सामना खेळत आहे. तर पाकिस्तानच्या संघातील तब्बल 10 खेळाडूसुद्धा घरच्या मैदानावर पहिलाच एकदिवसीय सामना खेळत आहेत.

2009मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौर्यावर आला असताना त्यांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानत केवळ एकच एकदिवसीय मालिका खेळविण्यात आली. 2015मध्ये झिंबाब्वेचा संघा पाकिस्तानात आला होता. त्यानंतर पाकिस्तानत एकही एकदिवसीय मालिका झालेली नाही. सर्फराजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंत, साहाला टफ फाईट; अखेर आपला खास यष्टीरक्षक करणार कमबॅक!

पाकिस्तानचा संघ : फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम, हॅरिस सोहेल, इफ्तिकार अहमद, सर्फराज अहमद, इमाद वसीम, वहाब रियाज, शादाब खान, महंमद आमीर, उस्मान शिनवारी 

श्रीलंकेचा संघ : अविष्का फर्नांडो, ओशडा फर्नांडो, लाहिरु थिरिमाने, सदीरा समाराविक्रमा, दनुष्का गुनाथिलका, शेहान जयसूर्या, दसुन शनाका, इसुरु उडाना, वाहिन्डु हसरंगा, नुवान प्रदीप, लाहिरू कुमारा  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan plays an international match on home ground after almost 10 years