Babar Azam Birthday : बाबरचा बर्थडे झाला खास; सेलिब्रेशनला 16 कर्णधारांची लाभली साथ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Skipper Babar Azam Birthday Celebration

Babar Azam Birthday : बाबरचा बर्थडे झाला खास; सेलिब्रेशनला 16 कर्णधारांची लाभली साथ!

Babar Azam Birthday : ऑस्ट्रेलियात येत्या उद्यापासून (16 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पूर्व संध्येला 16 संघाच्या कर्णधारांचा मेळावा भरवण्यात आला होता. कॅप्टन्स डे दिवशी वर्ल्डकप खेळणाऱ्या सर्व कर्णधारांचा एक मेळावा आयोजिक केला जातो. यावेळी सर्व कर्णधार फोटोशूट करत असतात. योगायोगाने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. हा वाढदिवस क्रिकेट जगतातील 16 कर्णधारांनी मिळून खास केला.

हेही वाचा: Women's Asia Cup INDW vs SLW Live : रेणुकाचा भेदक मारा; चौथ्या षटकात तीन विकेट्स

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 28 वर्षाचा झाला. यंदाचा वाढदिवस टी 20 वर्ल्डकप खेळणाऱ्या सर्व कर्णधारांनी मिळून साजरा केला. याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. तसेच बाबर आझमच्या बर्थडे केक कटिंगचा व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा: T20 World Cup : भारत-पाक कर्णधारांमध्ये चर्चा फक्त घर, गाडी बंगल्याचीच!

या फोटो आणि व्हिडिओत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचसहीत वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघाचे कर्णधार दिसत आहेत. बाबर आझमने बर्थडे केक कटिंग केल्यानंतर सर्व कर्णधारांनी बाबर आझमला शुभेच्छा दिल्या.