PAK vs NZ : पाकिस्तानची 48 तासांत संपली सत्ता! ICC वनडे रँकिंगमध्ये भारत पुन्हा पुढे

किवींनी पाकिस्तानचे मनसुबे उधळले
PAK vs NZ ICC ODI Rankings
PAK vs NZ ICC ODI Rankingssakal

PAK vs NZ ICC ODI Rankings : न्यूझीलंडने पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला आणि यजमानांच्या क्लीन स्वीपचे मनसुबे उद्ध्वस्त केले. मात्र या विजयानंतरही किवी संघाने पाच सामन्यांची मालिका 1-4 अशी गमावली. या पराभवामुळे पाकिस्तानला क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे.

अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने पहिल्या क्रमांकाचे स्थान गमावले आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्यासाठी बाबर आझम अँड कंपनीला पाचवी वनडे कोणत्याही परिस्थितीत जिंकायची होती पण कराची वनडेत पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

PAK vs NZ ICC ODI Rankings
RR vs SRH : ग्लेन फिलिप्सने सामना आणला खेचून अब्दुल समादने विजयावर केले शिक्कामोर्तब

मालिकेतील पाचवा एकदिवसीय सामना गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या पराभवामुळे तिला रेटिंग गुणांचे नुकसान झाले असून ती 112 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. ऑस्ट्रेलिया 113 रेटिंग गुणांसह पहिल्या तर भारत 113 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

PAK vs NZ ICC ODI Rankings
RR vs SRH : राजस्थानच्या तिघांनीच उडवला धुरळा! यशस्वी - बटलरने केली सुरूवात तर संजूने केला शेवट

न्यूझीलंडने दिलेल्या 300 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 46.1 षटकांत 252 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने 72 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या तर आगा सलमान 57 धावा करून बाद झाला. चौथ्या वनडेत शानदार शतक झळकावणारा कर्णधार बाबर आझम पाचव्या वनडेत 1 धावा करून बाद झाला. किवी संघाकडून हेन्री शिपले आणि रचिन रवींद्रने 3-3 बळी घेतले.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर विल यंगच्या 87 आणि लॅथमच्या 59 धावांच्या जोरावर किवी संघाने 49.3 षटकांत 299 धावा केल्या. मार्क चॅपमन 43 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 3 तर उस्मान मीर आणि शादाब खानने 2-2 विकेट घेतल्या. फखर जमानला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com