Usman Tariq Inspired by MS Dhoni Story
esakal
पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिक अनोख्या बॉलिंग अॅक्शनमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सुरु असलेल्या टी-२० स्पर्धेत त्याने एकमेव सामना खेळूला असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी अडचणीची ठरू शकते अशी क्रिकेटवर्तुळात चर्चा सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे तो आपल्या बॉलिंग अॅक्शनमुळे चर्चेत असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. धोनीवरील चित्रपटामुळे आपलं आयुष्य बदललं असं तो मानतो.