Pakistan Women Cricket : नाक रक्तबंबाळ! तीन पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूंमध्ये तुंबळ हाणामारी

पाकिस्तान क्रिकेट पुन्हा चर्चेत आलं आहे. तीन महिला क्रिकेटपटू एकमेकांना भिडले. तीनही महिला क्रिकेटपटूंवर अखेर PCB ने कारवाई केली.
Pakistan Women Cricket
Pakistan Women Cricketesakal

Pakistan Women Cricket : पाकिस्तान क्रिकेट हे कायम चर्चेत असतं. मात्र त्यांच्याभोवतीची चर्चा कायमच वादग्रस्त असते. आता देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत आलं आहे. त्यांनी नुकतेच तीन महिला क्रिकेटपटूंनी निलंबित केलं आहे. कारण काय तर या तीन महिला क्रिकेटपटूंमधील कॅटफाईट!

Pakistan Women Cricket
IND vs ENG 1st Test Day 3 Live : अखेर भारताचा उपकर्णधार आला धावून; आक्रमक डकेटसोबत रूटचीही केली शिकार

पीसीबीने नुकतेच सदाफ शम्स, युसरा आणि आयेशा बिलाल या क्रिकेटपटूंनी निलंबित केलं आहे. जिओ सुपरने दिलेल्या वृत्तानुसार देशांतर्गत क्रिकेटमधील तीन महिला क्रिकेटपटूंना निलंबित केल्याचं वृत्त दिलं. या महिला क्रिकेटपटू या राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यातील एका महिला क्रिकेटपटूच्या नाकातून रक्त देखील येत होतं.

मिळालेल्या माहितीनुसार सदाफ शम्स आणि युसरा यांनी त्यांचीच संघसहकारी आयेशा बिलालवर हल्ला चढवला. ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पीसीबीकडे एक अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. पीसीबीने या तीनही क्रिकेपटपटूंवर तात्पूर्ती बंदी घातली आहे. त्यांना पुढची नोटिस मिळेपर्यंत खेळण्यापासून देखील रोखण्यात आलं आहे.

Pakistan Women Cricket
FIH Hockey5s Women's World Cup : भारतीय महिला हॉकी संघ पोहचला फायनलमध्ये; रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

पाकिस्तान महिला क्रिकेटच्या प्रमुख तानिया मलिक या या प्रकरणी लवकरच चौकशी सुरू करणार आहे. राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सहा विभागाचे संघ खेळतात. यात कराची, लाहोर, पेशावर, क्वेट्टा आणि रावळपिंडी या संघांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com