ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला धमकी, 'पाकमधून जिवंत परत जाणार नाहीस' | Pakistan vs Australia Ashton Agar reportedly gets DEATH THREAT | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Tour of PakistanAshton Agar death threats

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला धमकी, 'पाकमधून जिवंत परत जाणार नाहीस'

Australia Tour of Pakistan, PAK vs AUS: ऑस्ट्रेलियन संघाचा पाकिस्तान दौरा संकटात सापडण्याचे संकेत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित द्विपक्षीय मालिकेत (Australia vs Pakistan) 3 कसोटी, 3 वनडे आणि 1 टी20 सामन्यांचा भला मोठा कार्यक्रम आखण्यात आला आहे. पण दौरा सुरु होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅश्टन अ‍ॅगर Ashton Agar याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटरला (Ashton Agar death threats) मिळालेल्या धमकीमुळे द्विपक्षीय मालिका संकटात येऊ शकते.

हेही वाचा: "ते हिंदुस्थानी असूच शकत नाहीत"

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अ‍ॅश्टन अ‍ॅगरयाचा पार्टनर मेडेलीन याला यासंदर्भात मेसेज आला आहे. त्याने यासंदर्भातील माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि पीसीबीला (PCB) दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. संडे मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, अ‍ॅश्टन अ‍ॅगरचा पार्टनर मैडलीन याला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज मिळाला. यामध्ये एगरने ऑस्ट्रेलिया संघातून पाकिस्तानला जाऊ नये, अशी ताकीद देण्यात आलीये. जर तो पाकिस्तानात आला तर तो जिवंत परतणार नाही, असा उल्लेखही यात करण्यात आला आहे. एश्टन एगर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या ताफ्यात सहभागी आहे.

Web Title: Pakistan Vs Australia Ashton Agar Reportedly Gets Death Threat Ahead Of Test Series

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..