PAK vs AUS: तुझं नाव कसं घेऊ? पाकिस्तानची यंग गर्ल चर्चेत

पाकिस्तानियांना पडला प्रश्न Marnus Labuschagne हे नाव कसे उच्चारायचे ?
Marnus Labuschagne
Marnus LabuschagneSakal

Pakistan vs Australia: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) संघामध्ये पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानात सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने पहिला डाव 4 बाद 476 धावांवर घोषित केला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने 7 बाद 449 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही 27 धावांनी पिछाडीवर आहे. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाज पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहेत. मार्नस लाबुशेन, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या फलंदाजांशिवाय चौथ्या दिवशी पाकिस्तानी तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

Marnus Labuschagne
रशियन खेळाडूचं संतापजनक कृत्य, युक्रेनियन प्रतिस्पर्ध्यासमोर छातीवर लावलं 'Z'

पाकिस्तानच्या खेळाडूंनी इंग्रजी शब्द उच्चारण्यात खूप वेळा चुका केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पाकिस्तानी चाहत्याचा एक फोटो यात भर घालताना दिसते. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात एक तरुणी स्टेडियमवर पोस्टबाजी करताना पाहायला दिसले. सामना पाहण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या तरूणीने हा पोस्टर हातात धरला होता. तरूणीने पोस्टरच्या माध्यमातून ऑस्ट्रोलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याला तुझे नाव कसे उच्चारायचे असा प्रश्न विचारला होता. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आपल्या अधिकृत अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतही ही तरुणी सर्वांचे लक्ष वधून घेते.

Marnus Labuschagne
Video: IPL 2022 साठी धोनीनं पापाजींना मारलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com