

Pakistan defeated Sri Lanka in the tri-series final by successfully chasing 325 runs, with Fakhar Zaman scoring a brilliant century as both teams combined for 656 runs and created 10 major ODI records
esakal
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला. दोन्ही संघांनी मिळून तब्बल ६५६ धावा केल्याने एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक जुने विक्रम मोडीत निघाले. विशेष म्हणजे, भारताने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध केलेल्या २४ वर्षांपूर्वीच्या विश्वविक्रमालाही पाकिस्तानने मागे टाकले. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना कमिंदू मेंडिसच्या शतकी खेळीच्या जोरावर ३२५ धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात यजमान पाकिस्तानने अवघ्या ४९ व्या षटकात सात गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले.