World Cup 2019 : विराट सेना उतरणार बॅटींगला; विजय शंकर संघात

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : साऱ्या विश्वकरंडाकातील सर्वांत जास्त हाय व्होल्टेज सामन्याला पाकिस्तान संघाने नोणेफेक जिंकून सुरवात केली. कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकताच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर चाहत्यांच्या तुडुंब गर्दीत सामन्याला सुरवात झाली. भारतीय संघाने शिखर धवनच्याऐवजी संघात विजय शंकरला स्थान दिले आहे. रोहित शर्मासह सलामीला लोकेश राहुल उतरेल तर गोलंदाजीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. पाकिस्तानने शादाब खानला संघात स्थान दिले आहे. 

नाणेफेकीनंतर कोहलीने फलंदाजीच करायची होती असे मत व्यक्त केले आहे. यावरुन भारतीय संघाचा आत्मविश्वास दिसून येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan won the toss and choose to bowl