Ind Vs Aus: 'अरे फिल्टर वाली दीदी...', भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind Vs Aus

Ind Vs Aus: 'अरे फिल्टर वाली दीदी...', भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 208 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. टीम इंडियाच्या या दारुण पराभवावर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने एक ट्विट केले, ज्यानंतर तिला खूप ट्रोल केल्या जात आहे. हार्दिक पांड्याने सामना संपल्यानंतर एक ट्विट केले ज्यामध्ये त्याने लिहिले की, आम्ही शिकू आम्ही चांगले करू. सर्व चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हार्दिक पांड्याच्या या ट्विटला पाकिस्तानी अभिनेत्रीने लिहिले की, 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धचा सामनाही हरला, जेणेकरून तुम्हाला आणखी शिकायला मिळेल.

हेही वाचा: IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

या ट्विट नंतर सेहर शिनवारी ट्रोल होत आहे. काही यूजर्सने लिहिले की, आधी तुमच्या देशाची अर्थव्यवस्था वाढवा, मग आमच्याशी बोला. एका यूजरने लिहिले की, घर सांभाळा बीबी, शेजाऱ्यांचे प्रश्न कायम राहतील. तर काही लोकांनी कमेंट केली की अरे फिल्टर वाली दीदी.... सेहर शिनवारीने याआधीही भारताच्या क्रिकेट सामन्याबद्दल अनेक ट्विट केले आहेत, ज्यावर तिला खूप ट्रोल करण्यात आले होती. त्याच दिवशी झालेल्या सामन्यातही पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

टीम इंडियाने मंगळवारी मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळल्या गेला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांची मोठी धावसंख्या उभारली. हार्दिक पांड्यानेही येथे धडाकेबाज अर्धशतक ठोकले, पण ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात हे मोठे लक्ष्य गाठले. याआधी आशिया कप-2022 मध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करू शकली नाही. आशिया कपमध्येही भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Web Title: Pakistani Actress Sehar Shinwari Tweet On India Vs Australia Match Trolled Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..