Asad Rauf : पाकचा एकेकाळचा एलिट अंपायर चालवतोय दुकान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistani Asad Rauf Once ICC elite Panel Umpire Runs Second Hand Goods Shop in Lahore

Asad Rauf : पाकचा एकेकाळचा एलिट अंपायर चालवतोय दुकान

लाहोर : साधारणपणे 10 वर्षापूर्वी पाकिस्तानच्या एका अंपायरचे जागतिक क्रिकेटमध्ये चांगले नाव होते. त्याने 2000 ते 2013 या कालावधीत 170 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केले होते. यात 49 कसोटी, 98 वनडे आणि 23 टी 20 सामन्यांचा समावेश होता. याचबरोबर हा अंपायर आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये देखील होता. मात्र आता 2022 मध्ये हा अंपायर लाहोरच्या लानदा बाझारमध्ये एक दुकान चावलतो. या अंपायरचं नाव आहे असद रौफ. (Pakistani Asad Rauf Once ICC elite Panel Umpire Runs Second Hand Goods Shop in Lahore)

हेही वाचा: आदिल राशिद हज यात्रेला जाणार; भारताविरूद्धच्या मालिकेला मुकणार

असद रौफ यांनी बऱ्याच वर्षानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आता मला क्रिकेटमध्ये कोणताच रस राहिला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले 'मी माझ्या आयुष्यात अनेक सामन्यात अंपायरिंग केली आहे. आता पाहण्यासरखं काही उरलेलं नाही.' हे वक्तव्य त्यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. 66 वर्षाचे रौफ म्हणाले की, 'मी 2013 पासून क्रिकेटपासून दूरच आहे. कारण मी ज्यावेळी एक काम सोडून देतो त्यावळी ते पूर्णपणे सोडून देतो.'

बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने 2016 मध्ये त्यांच्यावर 5 वर्षाची बंदी घातली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांच्यावर मॅच फिक्सिंग करणाऱ्या बुकींकडून महागड्या भेटवस्तू स्विकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हे आरोप 2013 च्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात झाले होते. यावर रौफ म्हणतात, 'जे काही घडले ते सोडले तर मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ आयपीएलमध्ये घालवला.' भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत रौफ म्हणाले, 'त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नव्हता. आरोप त्यांच्याकडूनच आले आणि त्यांनी निर्णय घेऊन टाकला.'

हेही वाचा: Ranji Trophy : यश - शुभमची शतकी खेळी; मध्य प्रदेशचे मुंबईला चोख प्रत्युत्तर

दरम्यान, 2012 मध्ये रौफ यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप देखील एका मुंबईतील महिलेने केला होता. त्यावर ते म्हणाले की, 'त्या मुलगीचे प्रकरण आले त्यावेळी मी त्याच्या पुढच्या वर्षी देखील आयपीएलमध्ये सहभागी झालो होतो.' रौफ यांना खेळाडूंबरोबर मैदानाबाहेरच्या नात्याबद्दल देखील वक्तव्य केले. ते म्हणाले, 'माझी सवयच अशी आहे. मी जॉली मूडमध्ये असणारा व्यक्ती आहे. खेळाडूच नाही त्यांच्या पत्नी देखील माझ्या सहवासासाठी कायम तयार असायच्या. म्हणायच्या असद भाई तुमचा सहवास आम्ही चांगलाच एन्जॉय करतो.'

दरम्यान, स्वस्त कपडे, पादत्राणे मिळणाऱ्या लानदा बाझारमधील आपल्या दुकानाबाबत बोलताना रौफ म्हणातात, 'मला कोणताही हव्यास नाही. मी खूप पैसा पाहिला आहे. मी खूप जग पाहिलं आहे पण, नियमात राहून. माझा एक मुलगा अमेरिकेतून पदवी घेऊन नुकताच परत आला आहे. मी दिवसातून पाच वेळा नमाज पढतो. माझी बायको देखील दिवसातून पाच नमाज पढते.'

हेही वाचा: उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी भारतीय महिला रग्बी खेळाडूवर बंदी

माझी सवयच आहे की जे काम मी सुरू करतो त्याच्या सर्वोच्च शिखरावर मी पोहचतोच. मी दुकानदारी सुरू केली आहे आणि मी याच्याही सर्वोच्च शिखरावर गेलो आहे. मी क्रिकेट खेळलो तर त्याच्याही सर्वोच्च शिखरावर गेलो. त्यानंतर मी अंपायरिंग सुरू केली. इथेही सर्वोकृष्ट कामगिरी करण्याचा मी प्रयत्न केला.'

Web Title: Pakistani Asad Rauf Once Icc Elite Panel Umpire Runs Second Hand Goods Shop In Lahore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top