हिंदू असल्याने कनेरियावर अन्याय केला असता तर...; मियाँदादची जहरी टीका

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

शोएब अख्तर आणि कनेरिया हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाल्यामुळे सध्या संघात नाहीत. तसेच त्यांचा क्रिकेट बोर्डाशी काहीही संबंध नाही.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तरने फिरकीपटू दानिश कनेरियाबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटविश्व सध्या ढवळून निघाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना शोएब खरं बोलत असल्याची प्रतिक्रिया दानिश कनेरियाने दिल्यानंतर उलट हे प्रकरण पुन्हा जोर धरू लागले आहे. 

- लवकरच नवा निवड समिती अध्यक्ष आणणार; गांगुलींनी दिला शब्द

या प्रकरणात आता आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी उडी घेतली आहे. दानिश हा पैशांसाठी काहीही बोलू शकतो, अशी जहरी टीका मियाँदाद यांनी केली आहे. 

- पाकला दाखवली लायकी; गांगुलींनी उचललं 'हे' मोठं पाऊल

'पीटीआय'शी बोलताना ते पुढे म्हणाले, ''कनेरिया जे बोलत आहे ते पूर्णपणे खोटे आहे. हिंदू असल्याने त्याच्यावर जर अन्याय झाला असता, तर तो दहा वर्षे संघातर्फे कसा काय खेळू शकला असता? खोटे बोलून कनेरिया पाकिस्तानच्या मिठाला जागला नाही. फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हाच त्याचं क्रिकेटमधील महत्त्व संपलं. आणि महत्त्वाची गोष्ट ही की, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खेळाडूवर लोक विश्वास ठेवत आहेत.''

दरम्यान शोएब अख्तरबद्दल बोलताना मियाँदाद म्हणाले, शोएब अख्तर आणि कनेरिया हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाल्यामुळे सध्या संघात नाहीत. तसेच त्यांचा क्रिकेट बोर्डाशी काहीही संबंध नाही. 2000 च्या काळात मी पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहिलो आहे. तेव्हा मला कनेरियावर हिंदू असल्यामुळे त्याला इतर खेळाडू त्रास देत आहेत, असं कधी जाणवलं नाही.

- कुलदीप यादवसह 'या' खेळाडूची हकालपट्टी; महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन

तसेच बोर्डाने कधी धर्मावरून एखाद्या खेळाडूवर अन्याय केला नाही. त्यामुळे या दोघांना किती महत्त्व द्यायचे आणि चर्चा करायची हे ठरवावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani cricketer Javed Miandad criticized Danish Kaneria and Shoaib Akhtar