
पाकच्या क्रिकेटरचे मोठे वक्तव्य; विराट, पुजारा आमच्याच कुटूंबामधील
पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने भारतचा कसोटी स्टार चेतेश्वर पुजारासोबत इंग्लड काउंटी क्रिकेटमध्ये डेब्यू केलं आहे. सध्या काउंटी क्रिकेटमध्ये पुजारा चांगलाच फॉर्मात आहे. दरम्यान, पुजारासोबत पदार्पण केलेल्या रिझवानने भारतीय खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा दोन देशांच्या खेळाडूंमध्ये संघर्ष होतो तेव्हा तो फक्त मैदानापुरता मर्यादित असतो. मैदानाबाहेर सगळे क्रिकेटपटू एका कुटुंबासारखे असतात, असे रिझवानने म्हटले आहे. रिझवान आणि पुजारा का संघ ससेक्सकडून एकत्र खेळत आहेत. यावेळी रिझवानने पुजाराचे कौतुकही केले आहे.
एका मुलाखती दरम्यान रिझवानने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मोठे वक्तव्य केलं आहे. क्रिकेट जग हे आमच्यासाठी माझ्यासाठी एक कुटूंब आहे. जर मी माझा विराट माझा पुजारा म्हटलं तर ते चुकीचं नाही. इतकेचं नव्हे तर स्टिव्ह स्मिथ असेल किंवा जो रुट हे देखील माझेच आहेत. यामध्ये काहीही चुकीचे नाही. कारण क्रिकेट हे कुटूंबासारखे आहे. असे मोठे वक्तव्य रिझवानने केले आहे.
रिझवानने आत्तापर्यंत पाकिस्तानकडून 22 टेस्ट, 44 वनडे आणि 56 टी 20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत. रिझवानच्या खात्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये 1112, 897 आणि 1662 धावा नावावर आहेत.
Web Title: Pakistani Cricketer Mohammad Rizwan Virat Kohli Our Cheteshwar Pujara Cricketing World One Big Family
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..