Video : पाकिस्तानच्या फॅनची माकडचेष्टा, खेळाडूला सेल्फी साठी बोलवलं अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani player selfie or autograph fan fan takes energy drink

Video : पाकिस्तानच्या फॅनची माकडचेष्टा, खेळाडूला सेल्फी साठी बोलवलं अन्...

Video : सध्या क्रिकेट जगतात पाकिस्तानच्या एका खेळाडूची जोरदार चर्चा रंगली आहे. चाहत्याने त्याची चांगलीच माकडचेष्टा केली. एखादा चाहता आपल्या दिशेने आला म्हटलं की, प्रत्येक खेळाडूला सेल्फी किंवा ऑटोग्राफ घेईल अशी अपेक्षा निर्माण होते. मात्र, पाकिस्तानविरुद्ध नेदरलँड्समध्ये झालेल्या सामन्यात भलतच पाहायला मिळालं.

पाकिस्तानने गेल्या आठवड्यात नेदरलँड्सविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप केला. दोन्ही संघाच्या तिसऱ्या मॅचदरम्यान एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. तिसऱ्या सामन्यादरम्यान एका चाहत्याने शादाब खान आणि हॅरिस रौफसोबत असे काही केले ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs PAK : पाकिस्तानी रिझवान तयारीला लागला रे... नेट्समध्ये सरावाचा Viral Video

शादाब खान आणि हॅरिस रौफसोबत या दोन्ही खेळाडूंना गेल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू मैदानावर इकडे तिकडे वावरताना होते. दरम्यान ड्रिंक्स घेऊन जात असताना एक चाहत्या तिथे आला त्यांना वाटलं सेल्फी किंवा ऑटोग्राफ घेईल. परंतु त्या चाहत्याने त्यांच्या हातातील स्टॅंडमधील चक्क दोन बाटल्या उचलल्या. हॅरिस खूश नसला तरी, तो चाहत्याशी मस्करी करताना आणि हसत हसत बाटली परत घेण्याचा इशारा करताना दिसला.

हेही वाचा: VIDEO: आशिया कपपूर्वी हार्दिक पंड्या बनला जसप्रीत बुमराह!

पाकिस्तानने गेल्या आठवड्यात नेदरलँड्सविरुद्ध ३-० असा क्लीन स्वीप केला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा क्लोज मॅचमध्ये पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने 206 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 197 धावांवर गारद झाला. कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 91 धावा केल्या. नसीम शाहने 5 आणि मोहम्मद वसीमने 4 विकेट घेतल्या.

Web Title: Pakistani Player Selfie Or Autograph Fan Fan Takes Energy Drink Cricket Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..