esakal | VIDEO : पाकिस्तानच्या महिला बॉलरमुळे शेन वॉर्न पुन्हा चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Ghulam Fatima

VIDEO : पाकिस्तानच्या महिला बॉलरमुळे शेन वॉर्न पुन्हा चर्चेत

sakal_logo
By
सुशांत जाधव

क्रिकेट जगतातील दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या फिरकीतील जादू आजही चर्चेचा विषय ठरते. हातभर चेंडू वळवण्याची त्याची क्षमता कमालीची अशीच होती. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज फलंदाजांना अक्षरश: नाचवल्याचे पाहायला मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या महिला फिरकीपटूमुळे शेन वॉर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये महिला फिरकीपटू ग़ुलाम फातिमाने (Ghulam Fatima) वनडे कप स्पर्धेत शेन वॉर्नसारखी जादू दाखवून दिली. पीसीबी डायनामाइट्सकडून खेळणाऱ्या फतिमाने पीसीबी स्ट्राइकर्स विरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजी करणाऱ्या महिला क्रिकेटला जबरदस्त चकवा दिला. फतिमाच्या फिरकीत शेन वॉर्नचा जादूई अंदाज पाहायला मिळाले.

हेही वाचा: "फालतू गप्पा नकोत, T20 World Cup कडे लक्ष द्या"; BCCIची ताकीद

फातिमाने फ्लाइट बॉल टाकून फलंदाजाला मोठा फटका मारण्याचे आमीष दाखवले. ज्यावेळी चेंडू पिचवर पडला त्यावेळी तो इतका वळला की फलंदाजाला कळायच्या आधी चेंडूनं लेग स्टम्प वेध घेतला होता. फातिमाने टाकलेल्या या चेंडूचा टप्पा ऑफ स्टम्पच्या खूप बाहेर पडला होता. शेन वॉर्न ज्याप्रमाणे आश्चर्यकारक रित्या चेंडू वळवायचा अगदी तसेच काहीसे चित्र फातिमाच्या फिरकीत दिसून आले.

हेही वाचा: कांगारुंना भिडण्यापूर्वी भारतीय वाघीनीची डरकाळी

या चेंडूचा सामना करणारी फरीहा देखील हातभर वळलेला चेंडू पाहून हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. फतिमाने फेकलेल्या या जादूई फिरकीनं क्रिकेट चाहत्यांना वार्नच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी' (Balls of the Century) ची आठवण आली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून फतिमावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

loading image
go to top