esakal | "फालतू गप्पा नकोत, T20 World Cup कडे लक्ष द्या"; BCCIची ताकीद
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून रंगल्या आहेत चर्चा

"फालतू गप्पा नकोत, T20 World Cup कडे लक्ष द्या"; BCCIची ताकीद

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup: इंग्लंडचा नियोजित दौरा लवकर आटोपून भारतीय खेळाडू IPL साठी युएईमध्ये दाखल झाले. आता युएईमध्ये आधी IPL धूम पाहायला मिळणार आहे. तर त्यापाठोपाठ टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरारही अनुभवायला मिळणार आहे. टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ पदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून रोहित आणि विराट यांच्यात कर्णधारपद विभागलं जाणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. यावर BCCI ने स्पष्टीकरण दिलं असून बातमीत तथ्य नसल्याचे सांगितलं. त्यासोबतच आज BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही काही बाबतीत आपली रोखठोक मतं मांडली.

हेही वाचा: T20 World Cup: 'त्या' फलंदाजाला वगळल्याने माजी क्रिकेटपटू नाराज

टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली कर्णधारपद सोडेल आणि रोहित शर्माकडे वन डे आणि टी२० संघाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी माहिती काही माध्यमांनी दिली. विराटला आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करायचे असल्याने असा निर्णय होणार असल्याचाही दावा करण्यात आला होता. पण विराट कोहली हाच भारतीय संघाचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार असेल, असे BCCI ने स्पष्ट केले. त्यानंतर BCCI चे उपाध्यक्ष यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. "सध्या सुरू असलेल्या चर्चा म्हणजे केवळ फालतू गप्पा आहेत. असल्या फालतू गप्पा बंद करून साऱ्यांनी टी२० विश्वचषकाकडे लक्ष द्या. त्यामुळे उगाच भविष्याच्या योजनांविषयी अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही. कर्णधारपदाविषयी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही", अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.

Virat Kohli and Rohit Sharma

Virat Kohli and Rohit Sharma

हेही वाचा: T20 World Cup : मॅथ्यू हेडनसह आफ्रिकेचा दिग्गज पाक संघाला देणार धडे

T20 World Cup 2021 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. आधी ही स्पर्धा भारतात होणार होती. पण भारतातील कोरोनाचा प्रसार आणि व्याप्ती पाहता ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे होणार आहे. या स्पर्धेत आधी पात्रता फेरी रंगणार आहे. त्यानंतर मूळ स्पर्धेला सुरूवात होईल. भारताचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

loading image
go to top