Pappu Yadav Son Sarthak Ranjan IPL 2026
esakal
बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने सार्थकला ३० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. त्याच्या आयपीएलमधील पदार्पणानंतर पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. आता सार्थकच्या नावानेच आमची ओळख निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.