

Para Archery WORLD SERIES 2026
esakal
अहमदाबाद : भारताच्या तिरंदाजांनी अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा मालिकेत घवघवीत यश संपादन केले. शीतल देवी हिने महिलांच्या कंपाउंड प्रकारात आणि हरविंदर सिंग-भावना यांनी रिकर्व्ह मिश्र प्रकारात सुवर्णपदक पटकावताना उल्लेखनीय कामगिरी केली. शीतल देवी हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली.