मी संघाच्या पाठिशी उभा; कमिन्सने माजी खेळाडूंना सुनावलं |Pat Cummins Statement About Justin Langer Resignation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pat Cummins Statement About Justin Langer Resignation
मी संघाच्या पाठिशी उभा; कमिन्सने माजी खेळाडूंना सुनावलं

मी संघाच्या पाठिशी उभा; कमिन्सने माजी खेळाडूंना सुनावलं

ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) जस्टीन लँगरला (Justin Langer) पाठिंबा का दिला नाही याबाबत आपले मत व्यक्त केले. त्याने संघाला आता नव्या कोचिंग स्टाईलची गरज आहे असे तो म्हणाला. याचबरोबर मी माझ्या संघासोबत कायम उभा राहणार असेही त्याने ठणकावून सांगितले. (Pat Cummins Statement About Justin Langer Resignation)

हेही वाचा: विराट लकी नंबरवरच अडला; कव्हर ड्राईव्हने केला घात

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) जस्टीन लँगरचा राजीनामा स्विकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंनी टीका केली होती. टी 20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या, अॅशेस मालिकेत (Ashes Series) 4-0 असा मोठा विजय मिळवल्यानंतरही जस्टीन लँगरला राजीनामा द्यावा लागतो हे चांगले नाही असा या टीकेचा सूर होता. त्यानंतर कसोटी संघातील उस्मान ख्वाजाने देखील या संपूर्ण प्रकरणावर कर्णधार पॅट कमिन्सने प्रतिक्रिया देऊन विषय संपवावा असे वक्तव्य केले होते.

अखेर पॅट कमिन्सने आपले वक्तव्य प्रसिद्ध करून त्याने जस्टीन लँगरला का पाठिंबा दिला नाही याचे कारण स्पष्ट केले. याचबरोबर त्याने टीका करणाऱ्या माजी खेळाडूंना खडसावले देखील. तो आपल्या वक्तव्यात म्हणाला की, 'अनेक माजी खेळाडूंनी माझ्याशी संपर्क साधून शांतपणे मला त्यांचा सल्ला दिला. या सल्ल्याचे मी स्वागतच करतो. काही माजी खेळाडू माध्यमांमध्ये जाऊन बोलले. त्यांच्या मताचेही मी स्वागत करतो. खेळाप्रती असलेलं त्यांचे प्रेम दाखवलं आणि आपल्या संघ सहकाऱ्याला पाठिंबा दिला. मला सर्व माजी खेळाडूंना सांगायचं आहे की जसं तुम्ही तुमच्या संघ सहकाऱ्याच्या कायम पाठिशी उभे राहता तसेच मी माझ्या संघसहकाऱ्यांच्या पाठिशी उभा राहत आहे.'

हेही वाचा: Player of the Year : पुरस्काराच्या शर्यतीतील 5 महिला खेळाडू

पॅट कमिन्स आपल्या वक्तव्यात पुढे म्हणाला की, 'जस्टीन लँगरने त्याची पद्धत ही आक्रमक होती हे मान्य केलं आहे. त्याने आपल्या आक्रमक वृत्तीबद्दल खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची माफी देखील मागितली होती. मात्र अशी माफी मागण्याची गरज नव्हती. त्याची आक्रमकचा हा मुद्दाच नव्हता. आता चांगल्या पायाभरणीनंतर ऑस्ट्रेलियाला आता नव्या कोचची आणि स्कीलसेटची गरज आहे.'

तो वक्तव्यात पुढे म्हणाला की, 'हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला खेळाडूंनी दिलेला फिडबॅक आहे. माझ्या माहितीनुसार सपोर्ट स्टाफने देखील हाच फिडबॅक दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संक्रमणासाठी कडक निर्णय घेतला आहे. मी माझी जबाबदारी गांभीर्याने घेतली आहे. माझी माझ्या संघ सहकाऱ्यांप्रती काही कर्तव्य देखील आहेत.'

Web Title: Pat Cummins Statement About Justin Langer Resignation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top