Paul Pogba less Manchester United slips to New Years Day defeat at Arsenal
Paul Pogba less Manchester United slips to New Years Day defeat at Arsenal

मँचेस्टर युनायटेडला वर्षाच्या सुरवातीलाच धक्का; आर्सेनलकडून पराभव

Published on

लंडन : इंग्लिश प्रिमियर लीगमधील दिग्गज मॅचेस्टर युनायटेडला संघाला वर्षाच्या सुरवातीलाच आर्सेनलकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आर्सेनलने 2-0 असा धुव्वा उडविला आहे.

इंग्लिश प्रिमियर लीग या वर्षाच्या सुरवातीलाच साखळी सामन्यात मधल्या फळीतील प्रमुख खेळाडू पॉल पॉग्बा याच्या अनुपस्थितीचा फटका मँचेस्टर युनायटेडला सहन करावा लागला. आर्सेनलने मँचेस्टरची बचावफळी भेदत दोन गोल नोंदविले अन् त्यांना संधीच दिली नाही.

आर्सेनलचा मधल्या फळीतील खेळाडू निकोलस पेप याने 8 व्या मिनिटाला गोल नोंदवत सुरवातीलाच आघाडी मिळविली. त्यानंतर पहिल्या हाफपूर्वी सोक्रॅटीस पापस्थापोलस याने 42 व्या मिनिटाला गोल करत 2-0 अशी आघाडी वाढविली. यानंतर त्यांनी आपला बचाव कायम ठेवत मँचेस्टरला संधीच दिली नाही. या विजयामुळे चँपियन्स लीगच्या गुणतालिकेत आर्सेनलने एक क्रमांक वर जात नववे स्थान मिळविले आहे. तर, मँचेस्टर युनायटेड पाचव्या स्थानावर कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com