esakal | Video : या माणसानं किती वेळा शून्यावर बाद होण्याचं ठरवलय!

बोलून बातमी शोधा

Nicholas Pooran
Video : या माणसानं किती वेळा शून्यावर बाद होण्याचं ठरवलंय!
sakal_logo
By
सुशांत जाधव

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्यांदा बॅटिंग करताना पंजाब किंग्जच्या संघाने पहिली विकेट लवकर गमावली. कर्णधार केएल राहुल आणि गेलने संघाचा डाव सावरला. मात्र गेल बाद झाल्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. निकोलस पूरन आणि शाहरुख खान यांना खातेही उघडता आले नाही. पुरनने 3 चेंडू खेळले. जेमिनसनने त्याची विकेट घेतली. युजवेंद्र चहलने शाहरुख खानला बोल्ड केले. सात सामन्यात चौथ्यांदा तो खाते उघडण्यात अपयशी ठरला आहे.

पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) ताफ्यातील प्रमुख फलंदाज असलेल्या कॅरेबियन निकोलस पूरन पुन्हा एकदा शून्यावर बाद झालाय. 4.2 कोटीचा हा गडी प्रत्येक सामन्यात अपयशी ठरताना दिसतोय. पहिल्या मॅचमध्ये तो केवळ एक बॉल खेळला होता. क्रिस मॉरिसने त्याला शून्यावर बाद केले. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात दोन चेंडू खेळला पण खाते उघडण्यात तो अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने स्पर्धेतील पहिली रन घेतली. या मॅचमध्ये त्याने 8 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. आवेश खानने त्याची विकेट घेतली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये चोरटी धाव घेताना तो एकही चेंडूचा सामना न करता माघारी गेला. 7 सामन्यात त्याच्या नावे आता 28 धावा जमा झाल्या आहेत. प्रत्येक मॅचला 4 च्या सरासरीने धावा करुन त्याने पंजाबच्या संघाची डोकेदुखी वाढली आहे.