Pakistan : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटने उचलले मोठे पाऊल! तीन प्रशिक्षकांची हकालपट्टी

Pakistan Cricket Team News | ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर संघाने बदलला कोच!
Pakistan Cricket Team News
Pakistan Cricket Team Newsेोकोत

वर्ल्ड कप 2023 च्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. कर्णधारापासून प्रशिक्षकापर्यंत बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 जानेवारीला होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपले परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर या तिघांशी बोलणार आहेत.

Pakistan Cricket Team News
साताऱ्याची अदिती अन् नागपूरच्या ओजसला अर्जुन पुरस्कार प्रदान, कोण बनला खेलरत्न? जाणून घ्या संपूर्ण यादी

आशिया कप आणि वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डंने निर्णय घेतला आणि त्यांना सांगण्यात आले की, राष्ट्रीय संघात त्याच्या सेवांची आता आवश्यकता नाही. या तिघांना सांगण्यात आले की पीसीबीने निर्णय घेतला आहे की ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करतील, कारण त्यांनी मोहम्मद हाफिजची पाकिस्तान संघाचे संचालक आणि नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु पीसीबीला कळले की या तिघांच्या करारात असा कोणताही नियम नव्हता ज्यामुळे त्यांना एनसीएमध्ये कायमस्वरूपी काम करावे लागले.

Pakistan Cricket Team News
Maldives-India Row : पाकिस्तानी खेळाडू चक्क PM मोदींच्या पाठीशी! 'त्या' ट्विटनंतर सोशल मीडियावर उडाली खळबळ

अधिकाऱ्याने सांगितले की, 'मिकी आधीच डर्बीशायरसोबत आहे. पुटिक आणि ब्रॅडबर्न यांना नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे काही चर्चेनंतर कोणताही मतभेद न होता हे प्रकरण संपवून त्यांच्या करारातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिघांनाही बोर्ड काही महिन्यांचा पगार भरपाई म्हणून देणार असल्याचे त्यांनी मान्य केले.

अधिकाऱ्याने असेही पुष्टी केली की, फलंदाजी प्रशिक्षक पुटिक यांनी करार स्वीकारण्यापूर्वी पीसीबीला अफगाणिस्तानसोबतच्या त्याच्या नवीन असाइनमेंटबद्दल माहिती दिली होती. त्याचप्रमाणे ब्रॅडबर्ननेही पीसीबीला कळवले होते की, इंग्लिश काउंटी ग्लॅमॉर्गन त्याला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू इच्छित आहे.

पाकिस्तानला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 360 धावांनी, दुसऱ्या सामन्यात 79 धावांनी आणि तिसऱ्या सामन्यात 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com