PCBची मोठी घोषणा! ज्युनिअर खेळाडूंना 'अशी' संधी देणारे पहिलं बोर्ड | Pakistan Junior League | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCB Chairman Ramiz Raja announce details Pakistan Junior League

PCBची मोठी घोषणा! ज्युनिअर खेळाडूंना 'अशी' संधी देणारे पहिलं बोर्ड

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी 12 महिन्यांच्या क्रिकेट वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी एक वर्षाच्या कार्यक्रम व्यतिरिक्त, बोर्डाने प्रथमच पाकिस्तान ज्युनियर लीग (PJL) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्युनियर लीग मधून तळागाळातील प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. PJL ही देशांतर्गत T20 स्पर्धा आहे. जी या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची माहिती आहे. (Pakistan Junior League)

हेही वाचा: इन्शा अल्लाह! दोन आफ्रिदी एकत्र प्रार्थना करतात तेव्हा...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन अरमन रमीझ राजा यांनी PCB च्या ट्विटर हॅण्डल ही वरून माहित दिली. त्यावर बोलताना रमीझ राजा बोले की, आज मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे की अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर पाकिस्तान ज्युनियर लीगसाठी अधिकृत पणे तयार झाली आहे. ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय लीग आहे. ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्याची योजना करत आहे. पाकिस्तान ज्युनियर लीग ही शहर आधारित असल्याने त्यामध्ये आंतरराष्ट्रीय वयोगटातील क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या मसुदा प्रणालीद्वारे खेळाडूंची निवड केली जाईल.

1992 च्या विश्वचषक मधील माजी खेळाडू सांगितले की, PJL सारखा हा उपक्रम सर्व क्रिकेटपटूंसाठी संधी निर्माण करणे, प्रतिभा ओळखणे, त्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू बनवणे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अंतर कमी करणे आहे.

रमीझ राजा पुढे म्हणाले की, या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट व्यावसायिकता आणणे आणि प्रतिभाशाली खेळाडू निर्माण करणे हे आहे. तरुणांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल आणि ते धावा करून आणि विकेट्स घेऊन दबावाखाली कामगिरी करू शकतील.

Web Title: Pcb Chairman Ramiz Raja Announce Details Pakistan Junior League First International League

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top