PCB : रमीझ राजांच्या 'बुलेटप्रूफ' कार वापराबाबत संसदीय समितीकडून विचारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCB Chairman Ramiz Raja Questioning about Bulletproof car In national assembly standing committee on sports

PCB : रमीझ राजांच्या 'बुलेटप्रूफ' कार वापराबाबत संसदीय समितीकडून विचारणा

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक रमीझ राजा हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र रमीझ राजा आता त्यांच्या वक्तव्यांमुळे नाही तर त्यांच्या गाडीमुळे चर्चेत आले आहेत. रमीझ राजा यांनी पाकिस्तान संसदेच्या क्रीडा स्टॅडिंग कमिटीसमोर सांगितले की त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याने ते सध्या बुलेटप्रूफ गाडी वापरतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक असल्याने मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक फायद्यांबाबत विचाणा झाल्यावर रमीझ राजा म्हणाले, 'यामुळे कोणताही आर्थिक ताण पडत नाही.' असे उत्तर दिले. (PCB Chairman Ramiz Raja Questioning about Bulletproof car In national assembly standing committee on sports)

हेही वाचा: ENG vs IND Day 4 : दिवसअखेर रूट - बेअरस्टोची दीडशतकी भागीदारी

पीसीबी रमीझ राजांच्या औषधोपचारांचाही खर्च उचलते. दरम्यान, एका सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार रमीझ राजांनी ते सुरक्षेच्या कारणास्तव बोर्डाची बुलेटप्रूफ गाडी वापरतात. याव्यतिरिक्त त्यांना बोर्डाकडून इतर आर्थिक फायदे घेण्याचे टाळतात.'

सूत्रांनी सांगितले की, रमीझ राजा संसद समितीने रमीझ राजा यांच्याबरोबर पीसीबी चेअरमन म्हणून त्यांच्या भविष्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. सरकार बदल्यानंतर कोणीही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केलेला नाही. सूत्रांनी सांगितले की, 'रमीझ राजा यांनी समितीसमोर दोन तास चाललेल्या संभाषणात त्यांनी फक्त दिवसाचा भत्ता, हॉटेल आणि प्रवास खर्च एवढेच बोर्डामार्फत नियमानुसार मिळते. रमीझ राजा म्हणाले की त्यांच्यापूर्वीचे पीसीबी अध्यक्ष देखील बुलेटप्रूफ गाडी वापरत होते.'

हेही वाचा: ENG vs IND : इंग्लंडलने चौथ्या डावात चेस केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?

दरम्यान, संसदीय समितीने रमीझ राजा यांनी दुसऱ्या बैठकीवेळी ऑडिट जनरलचा वार्षिक रिपोर्ट सोबत आणण्यास सांगितला आहे. याचबरोबर समितीने रमीझ राजा यांच्याकडून संघाची कामगिरी, भविष्यातील योजना आणि पाकिस्तान सुपर लीगबाबत देखील माहिती घेतली. रमीझ राजांच्या कारभारावर बहुतांश समिती सदस्य समाधानी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Pcb Chairman Ramiz Raja Questioning About Bulletproof Car In National Assembly Standing Committee On Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..