IPL vs PSL : पीएसएलने आयपीएलला सोडले मागे... पीसीबी अध्यक्षांनी केला धक्कादायक दावा

पाकिस्तान सुपर लीगचा आठवा हंगाम शनिवारी संपला आणि आता आयपीएल ...
IPL vs PSL
IPL vs PSL

IPL vs PSL : पाकिस्तान सुपर लीगचा आठवा हंगाम शनिवारी संपला. लाहोर कलंदर्सने सलग दुसऱ्यांदा लीगचे विजेतेपद पटकावले. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोरने मोहम्मद रिझवानच्या मुलतान सुलतान्सचा एका धावेने पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना कलंदरने 20 षटकांत 6 गडी गमावून 200 धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने 40 चेंडूत 65 धावांची खेळी केली. त्याचवेळी कर्णधार शाहीनने 15 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. त्यानंतर लाहोरने मुलतानला 199/8 च्या स्कोअरवर रोखले. पाकिस्तान सुपर लीग संपल्यानंतर आता चाहते आयपीएलच्या 16व्या आवृत्तीची वाट पाहत आहेत.

IPL vs PSL
WPL 2023चा आज मिळणार पहिला फाइनलिस्ट! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रिय टी-20 लीग मानली जाते. कारण त्याच्या मोठ्या चाहत्यांचे फॉलोइंग आणि रोमांचक सामने आहेत. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी आता दोन्ही लीगबाबत धक्कादायक मत व्यक्त केले आहे.

डिजिटल रेटिंगच्या बाबतीत पीएसएल हे आयपीएलपेक्षा मोठे यश असल्याचे म्हटले आहे. पीएसएल फायनलपूर्वी नजन सेठी म्हणाले होते, पीएसएल सीझनच्या अर्ध्या वाटेवर होता, म्हणून मी आमच्या डिजिटल रेटिंगबद्दल विचारले. नजम सेठी शोला टीव्हीवर 0.5 रेटिंग असायची तर पीएसएलला 11 पेक्षा जास्त रेटिंग मिळत आहे.

IPL vs PSL
Boxing Championships : जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत साक्षी, लवलिना उपांत्यपूर्व फेरीत

पुढे बोलताना नजन सेठी म्हणाले की, 150 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाकिस्तान सुपर लीग डिजिटल पद्धतीने पाहिली. ही काही छोटी गोष्ट नाही. त्याच वेळी आयपीएलचे डिजिटल रेटिंग 130 दशलक्ष होते, तर पीएसएलचे टीव्ही रेटिंग 150 दशलक्षांपेक्षा जास्त होते. त्यामुळे पाकिस्तानसाठी हे मोठे यश आहे.

IPL बद्दल बोलायचे झाले तर, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com