पाकिस्तानने हाकलला अख्खा कोचिंग स्टाफ

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर, फलंदाजीचे प्रशिक्षक अझहर मेहमूद, गोलंदाजीचे प्रशिक्षक ग्रॅंट फ्लोव्हर आणि ट्रेनर ग्रॅंट लूडेन यांचा पाकिस्तान संघासोबतचा करार वाढविण्यास नकार दिला आहे. 

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर, फलंदाजीचे प्रशिक्षक अझहर मेहमूद, गोलंदाजीचे प्रशिक्षक ग्रॅंट फ्लोव्हर आणि ट्रेनर ग्रॅंट लूडेन यांचा पाकिस्तान संघासोबतचा करार वाढविण्यास नकार दिला आहे. 

पीसीबीची शुक्रवारी सभा झाली. या सभेमध्ये बोर्डाचे प्रमुख एहसान मानी यांनी या प्रस्तावाला परवानगी दिली. त्यामुळे आता पीसीबी नव्या प्रशिक्षकांसाठी जाहिरात करेल आणि अर्ज मागवून घेईल.

''पीसीबीच्यावतीने मी मिकी आर्थर, अझहर मेहमूद, ग्रॅंट फ्लोव्हर आणि ग्रॅंट लूडेन यांच्या कामासाठी त्यांचे आभार मानतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा,'' असे मत मानी यांनी व्यक्त केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCB decides not to renew contracts of Mickey Arthur Azhar Mahmood and Grant Flower