Brij Bhushan singh: ब्रिजभूषण यांचे 'ते' फोटो आले समोर... पहिलवानांच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठे पुरावे

wrestlers protest Brij Bhushan singh
wrestlers protest Brij Bhushan singh

Brij Bhushan singh : कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप खासदार आणि माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात तक्रारदाराच्या दाव्याला पुष्टी देत पुराव्यांमध्ये फोटोंचाही समावेश करण्यात आला आहे.

आरोपपत्रात अनेक फोटोही सादर करण्यात आली आहेत ज्यावरून हे सिद्ध होते की, लैंगिक छळाची घटना घडलेल्या कार्यक्रमात ब्रिजभूषण शरण सिंह उपस्थित होते. तथापि, अशोका रोड दिल्ली येथे असलेल्या WFI कार्यालयात व्हिजिटर रजिस्टर किंवा सीसीटीव्ही नव्हते. त्यांच्या घराचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

wrestlers protest Brij Bhushan singh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अचानक संघात निवड, 'या' दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वाखाली करणार पदार्पण?

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आयपीसीच्या कलम 506, 354 आणि 354 अ अंतर्गत लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग केल्याप्रकरणी खटला चालवला जाऊ शकतो. यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.

आरोपपत्रानुसार WFI अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या चार फोटोंनुसार बृजभूषण शरण सिंह महिला कुस्तीपटूसोबत कझाकिस्तानमध्ये उपस्थित होते. त्याचवेळी असे दोन फोटो आहेत ज्यामध्ये ब्रिजभूषण कुस्तीपटूच्या जवळ असल्याचे दिसत आहे. फोटो, कॉल डिटेल्स आणि WFI कडून मिळालेल्या साक्षीदारांच्या रेकॉर्डच्या आधारे, आरोपपत्रात असे म्हटले आहे की, ब्रिजभूषण सहापैकी पाच पीडितांनी सांगितलेल्या छळाच्या ठिकाणी उपस्थित होते.

wrestlers protest Brij Bhushan singh
Brij Bhushan Singh : आधी चिडले, नंतर माईक फोडला… चार्जशीटच्या 'त्या' प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह प्रचंड संतापले

पहिल्या कुस्तीपटूने केलेल्या आरोपांमध्ये असे म्हटले आहे की, प्रशिक्षक मला ब्रिजभूषण यांना भेटायला घेऊन गेले. तेथे त्याने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या एका हातात ध्वज होता, म्हणून मी दुसऱ्या हाताने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. मी एकदा कुस्ती लीगमध्ये सेट हरल्यानंतर बॉक्समध्ये गेले. ब्रिजभूषण तिथे आला आणि त्याने मला जबरदस्तीने मिठी मारली. त्याने 15 ते 20 सेकंद धरले. मी त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला जाऊ दिले नाही.

wrestlers protest Brij Bhushan singh
Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहला होणार 5 वर्षांचा तुरुंगवास? पोलिसांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे

दोन फोटोमध्ये तो कुस्तीपटूजवळ उभा असल्याचे दिसत आहे. ब्रिजभूषण त्या ठिकाणी उपस्थित होते याचा पुरावा व्हिडिओ आणि फोटो आहेत. दुसऱ्या कुस्तीपटूने आरोप केला की, मला डब्ल्यूएफआय कार्यालयात बोलावण्यात आले जेथे मी माझ्या प्रशिक्षकासह गेले होते… भूषणने मला खुर्चीवर बसायला सांगितले.… मी त्यांना माझ्या दुखापतीबद्दल माहिती दिली… त्याने मला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, मात्र यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे सांगितले. त्या दिवशी प्रशिक्षक आणि पीडित तरुणी दिल्लीच्या त्या भागात उपस्थित असल्याचा पुरावा आहे.

संघाच्या फोटोदरम्यान ब्रिजभूषण यांनी चुकीच्या पद्धतीने हात पकडल्याचा आरोप एका खेळाडूने केला आहे. इतर खेळाडूंनीही असेच आरोप केले आहेत. आरोपपत्रात त्या पुराव्यांचा उल्लेख आहे ज्यावरून ब्रिजभूषण त्यावेळी तिथे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com