Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अचानक संघात निवड, 'या' दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वाखाली करणार पदार्पण?

निवडकर्त्यांनी उघडले सचिनच्या मुलाचे भवितव्य
Arjun Tendulkar
Arjun Tendulkaresakal

Arjun Tendulkar : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला. अर्जुनची कामगिरी चांगली होती आणि त्याने चेंडूच्या जोरावर अनेक मोठे विकेट घेतले. या खेळाडूला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि त्यांची प्रतीक्षा आयपीएल 2024 पूर्वी संपणार आहे. आगामी देवधर ट्रॉफीसाठी अर्जुनचा दक्षिण विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज असलेल्या अर्जुनने इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला ऑगस्टमध्ये उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडूंच्या शिबिरातही स्थान दिले होते. गोव्याच्या अर्जुनशिवाय कर्नाटकच्या विद्वत कावेरापा आणि विजयकुमार विशाक आणि व्ही कौशिक यांना दक्षिण विभागीय वेगवान आक्रमणात स्थान मिळाले आहे.

Arjun Tendulkar
Wi vs Ind Test : सलामीला कोण, कोणाला मिळणार डच्चू?, कसोटी संघबांधणीची प्रक्रिया आजपासून

पुद्दुचेरी येथे 24 जुलैपासून होणार्‍या देवधर ट्रॉफी या 50 षटकांच्या स्पर्धेसाठी मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील दक्षिण विभागीय संघात अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. 13 ते 23 जुलै दरम्यान कोलंबो येथे होणाऱ्या इमर्जिंग आशिया कपमध्ये खेळणाऱ्या बी साई सुदर्शनला स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने चमकदार कामगिरी केली होती. पहिल्याच सामन्यात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावून वडील सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. मुंबईच्या बाजूने अनेक मोसमांच्या प्रतीक्षेनंतर अर्जुनला संधी मिळू शकली नाही तेव्हा तो गोवा संघाकडे वळला.

अर्जुनचे आयपीएलमध्ये पदार्पण

इंडियन प्रीमियर लीगच्या नुकत्याच झालेल्या सीझनमध्ये अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सकडून त्याने आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले. या मोसमात त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात अर्जुनने 3 विकेट घेतल्या आणि 13 धावा केल्या. या कामगिरीनंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले.

संघ खालीलप्रमाणे - मयंक अग्रवाल (कर्णधार), रोहन कुनुमल, एन जगदीशन, रोहित रायुडू, केबी अरुण कार्तिक, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, वॉशिंग्टन सुंदर, विद्वत कावेरापा, विजयकुमार विशाक, कौशिक व्ही, रोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, अर्जुन तेंडकर, अर्जुन के.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com