पिंपरी चिंचवडच्या सागर कांबळेने केला विक्रम; २ तास १८ मिनिटांत पार केली खाडी

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

खाडी पोहून जाण्याची पूर्व तयारी म्हणून पिंपरी चिंचवडच्या सागर कांबळे याने पश्चिम बंगाल येथील १९ किलोमीटर अंतराची खाडी २ तास १८ मिनिटांत पोहून पार केली. 

खाडी पोहून जाण्याची पूर्व तयारी म्हणून पिंपरी चिंचवडच्या सागर कांबळे याने पश्चिम बंगाल येथील १९ किलोमीटर अंतराची खाडी २ तास १८ मिनिटांत पोहून पार केली. 

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगी गावापासून दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी त्याने खाडी पोहायला सुरवात केली. त्यानंतर, सायंकाळी ४.४५ वाजता बेहरमपूर गावाजवळ त्याच्या मोहिमेची समाप्ती झाली. 

दोन वर्षांपूर्वी याच खाडीत कांबळे याने ८१ किलोमीटर चे अंतर पार केले होते. त्याने आत्तापर्यंत धरमतर ते गेटवे आॅफ इंडिया (३५ किमी), दक्षिण आफ्रिकेतील रॉबिन आयलंड (९ किमी), डॉगलेग (१८ किमी) आणि अमेरिकेतील कॅटलिना खाडी (३२ किमी) पोहली आहे. पुढील वर्षी जुलै २०२० मध्ये इंग्लिश खाडी पोहून जाण्याचे त्याचे ध्येय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwads Sagar Kumble gains a records of passing bay in 2 hour passed 5 minutes