Rishank Devadiga prediction : प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) १२ वा हंगामाला २९ ऑगस्ट २०२५ रोजी विशाखापट्टणम येथे सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामातही एकूण १२ संघ विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई, दिल्ली या चार ठिकाणी होणाऱ्या टप्प्यांमधून विजेतेपदासाठी खेळणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम येथील राजीव गांधी इंडोर स्टेडियममध्ये तेलगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवाज आणि बेंगळुरू बुल्स विरुद्ध पुणेरी पलटण अशा ब्लॉक बस्टर लढतींनी स्पर्धेला सुरुवात होईल.